वास्तू ही भारतीय समाजाची जुनी परंपरा आहे. त्याचे नियम पाळले तर जीवन सुखी होते. वास्तूमध्ये दिशांना खूप महत्त्व आहे. घरामध्ये चुकीच्या दिशेने कोणतेही बांधकाम झाले असेल तर त्यामुळे कुटुंबाचे काही ना काही नुकसान होते. घर बनवताना काही नियमांचे पालन केले तर कुटुंबात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदते. घर बांधणीशी संबंधित काही टिप्स आज जाणून घेऊयात.
– घर नेहमी मोठे आणि रुंद असावे कारण अरुंद आणि लांब घरामुळे समस्या निर्माण होतात.
– घर नेहमी सर्व बाजूंनी उघडे असले पाहिजे, याचा अर्थ ते इतर कोणत्याही इमारतीला लागून नसावे, म्हणजे दोन घरांना समान भिंत नसावी.
– घराचा मुख्य दरवाजा पूर्वेच्या मध्यभागी न ठेवता उत्तर-पूर्व किंवा आग्नेय दिशेला असावा.
– घराच्या उत्तर दिशेला जास्तीत जास्त खिडक्या आणि दरवाजे असावेत. घराची बाल्कनी आणि वॉश बेसिनही याच दिशेने असावे. वास्तूनुसार, यामुळे धनहानी आणि करिअरमधील अडथळे दूर होतात.
– शयनकक्ष/बेडरुम घराच्या दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला बनवावे.
– घरातील स्नानगृह/बाथरुम पूर्व दिशेला बनवावे, त्यासाठी तीच दिशा योग्य मानली जाते.
– मुलांची अभ्यासाची खोली पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला असावी. त्यामुळे मुलांचे ज्ञान वाढते.
– घरामध्ये स्वयंपाकघर/किचन बनवण्यासाठी आग्नेय कोन ही सर्वात महत्त्वाची दिशा मानली जाते, म्हणजेच जेव्हाही तुम्ही स्वयंपाकघर बनवता तेव्हा आग्नेय कोनातच बनवा.
– घराचे मंदिर/देवघर नेहमी ईशान्य दिशेला बनवावे कारण यामुळे सुख, समृद्धी आणि शांती वाढते.
– घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण दिशा ही सर्वोत्तम जागा मानली जाते.
घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.