May 18, 2024

प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, तर जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

रिअल इस्टेट मधील गुंतवणूक ही दीर्घकालीन असते. म्हणजेच, एकदा घर विकत घेतल्यावर, पुन्हा या प्रक्रियेतून आपण बराच काळ जात नाही. लोकांना सामान्यतः रिअल इस्टेट क्षेत्राचा फारसा अनुभव नसतो. परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की, जे लोक प्रथमच रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवत आहेत त्यांच्यासाठी काही धोकेही यात आहेत. चुकून तुम्ही अशी मालमत्ता खरेदी करू शकता जी तुमच्यासाठी फायदेशीर नाही. तुम्ही मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा पाच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या 5 टिप्स खासकरून त्यांच्यासाठी चांगल्या आहेत जे पहिल्यांदाच रिअल इस्टेट किंवा मालमत्ता खरेदी करत आहेत किंवा गुंतवणूक करत आहेत.

रेरा रजिस्ट्रेशन
प्रॉपर्टी किंवा मालमत्ता शोधत असताना, तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की हा प्रकल्प रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (RERA) नोंदणीकृत आहे की नाही. तुम्ही RERA क्रमांक आणि मंजुरीची पडताळणी ऑनलाइन किंवा स्थानिक पालिका अधिकाऱ्यांमार्फत करू शकता.

इतर खर्चाचा विचार करा
प्रॉपर्टी निवडताना तुम्ही मासिक देखभाल/मेंटेनन्स शुल्क, सुरक्षा आणि सोशल क्लब यांसारख्या सुविधा, वीजपुरवठा, पाणी शुल्क इत्यादी गोष्टींचाही विचार करावा. हे खर्च तुम्हाला नंतर महागात पडू शकतात. तुम्हाला हे अतिरिक्त खर्च लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि ते तुमच्या बजेटला अनुकूल आहे की नाही ते तपासणे गरजेचे आहे. तुम्ही इतर पूर्ण झालेल्या किंवा बांधकामाधीन प्रकल्पांच्या बाजार मूल्याची तुलना करावी.

बजेटसाठी प्लॅन तयार करा
प्रॉपर्टीचा शोध सुरू करण्यापूर्वी त्याचे बजेट तयार करा. हा प्लॅन तुमच्या अत्यावश्यक गरजांना धक्का न लावता कर्जाची परतफेड करण्याच्या तुमच्या क्षमतेमध्ये (जर तुमच्याकडे कर्ज असेल किंवा घ्यायचे असेल तर) असावे. ब्रोकर किंवा एजंट तुम्हाला जास्त खर्च करण्यास प्रवृत्त करू शकतात. यासाठी ते तुम्हाला हाय रिटर्न्स मिळण्याचा शब्द देऊ शकतात. परंतु यामुळे तुमच्या गृहकर्जाची परतफेड करण्यात चूक झाल्यामुळे होणारे नुकसान भरून निघणार नाही.

असा वाचवा टॅक्स
पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना सरकार आकर्षक गृहकर्ज प्रोत्साहन देते. तुम्हाला पीएम आवास योजनेअंतर्गत कमी व्याजदराचा लाभ मिळतो. याशिवाय, कलम 24C अंतर्गत गृहकर्जाच्या व्याजदरावर आणि कलम 80C अंतर्गत मूळ पेमेंटवर नोंदणी आणि मुद्रांक शुल्कावरही कर लाभ मिळेल. विकसकाशी कोणताही करार करण्यापूर्वी कागदपत्रे नीट वाचा.

कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी
तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला त्याचे काय करायचे आहे हे स्पष्ट करा. तुम्हाला त्यातून भाड्याचे उत्पन्न मिळवायचे आहे किंवा ते स्वतःसाठी घ्यायचे आहे किंवा ते पुन्हा विकून नफा मिळवायचा आहे. या मुद्द्यांवर स्पष्ट असण्याने तुम्हाला मालमत्तेचा अधिक चांगला न्याय करण्यास मदत होईल. तुमच्‍या उद्देशानुसार, तुम्‍ही प्रॉपर्टीत अल्प किंवा दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवण्‍यापूर्वी याबाबत स्‍पष्‍ट असले पाहिजे.

घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.

Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *