November 15, 2024

या कारणांमुळे घरात येते गरिबी

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करत असतो. प्रत्येकाच्या यशाची व्याख्या जरी वेगळी असली तरी अंतिम ध्येय हे ठरवलेल्या गोष्टी साध्य करण्याच्याच असतात. सामान्य माणूस असो किंवा एखादा अब्जाधीश. ही सर्व मंडळी प्रयत्नांबरोबर काही इतर गोष्टींचाही अवलंब करत असतात. त्यायोगे आपले नशीब लवकर उजळेल असे त्यांना वाटत असते. अनेकांना यात यश मिळते. पण काही जण असेही असतात की कष्ट तर भरपूर करतात. त्याचबरोबर त्यांचा धार्मिक ओढाही असतो. तरीही त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही. छोट्या छोट्या गोष्टींमुळे काही कामे अडतात. त्याचा फटका त्या व्यक्तीला बसतो.

काही अशा गोष्टीही असतात ज्या नकळतपणे आपल्यावर प्रभाव टाकत असतात. बहुतांशवेळा याचे नकारात्मक परिणामच दिसून येतात. आपल्या घरात अशा काही वस्तू असतात की त्यामुळे आपल्या नशिबाचा फेरा अडकून राहिलेला असतो. त्या छोट्या गोष्टींवर उपाय शोधून आपण आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर करु शकतो. वास्तू शास्त्रात याबाबत सांगण्यात आले आहे. आज आपण त्याबाबत जाणून घेणार आहोत.

वास्तू शास्त्रानुसार घरातील काही वास्तू दोष जर वेळेवर दूर केले नाहीत तर यामुळे घरात आर्थिक तंगी निर्माण होऊ शकते.

वास्तूदोषामुळे आर्थिक तंगी
असे कोणते वास्तूदोष आहेत, ज्यामुळे आर्थिक संकटाचा आपल्याला सामना करावा लागू शकतो? अशाच गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सुकलेले झाड किंवा वनस्पती
घरातील सुकलेले झाड-वनस्पती आणि फुले त्वरीत काढून टाकली पाहिजेत. सुकलेली किंवा वाळलेली झाडं घरातील धन-वैभवास प्रभावित करतात.

तुटलेली-फुटलेली भांडी
असे म्हटले जाते की, तुटलेली भांडी, देवांची भग्न झालेली मुर्ती घरात असतील तर राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो आणि आर्थिक अडचणांचा सामना करावा लागू शकतो.

बंद घड्याळ
घरात कधीच बंद घड्याळ ठेवू नये. यामुळे आपल्या यशात अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे अडथळ्याचा सामना करावा लागतो.

पाण्याला गळती
घरातील नळातून पाणी गळत असेल तर यामुळे वास्तू दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे धन हानी होण्याचा धोका अधिक असतो, असे म्हटले जाते.

खराब किंवा नादुरुस्त साहित्य
घरात गंज लागलेले सामान/साहित्य, खराब किंवा नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुटलेला किंवा तडकलेला आरसा ठेवू नये. या वस्तूंमुळे सातत्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.

Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *