November 15, 2024

वेळेआधी होम लोन फेडायचं असेल तर या मार्गांनी होईल तुमची EMI मधून सुटका

घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण ते विकत घेणे प्रत्येकाला शक्य नसते. घर खरेदी करण्यासाठी गृहकर्जाची मदत घ्यावी लागते. बँक कर्ज देते. ज्यासाठी ग्राहकाला दर महिन्याला ईएमआय भरावा लागतो. तसे, होम लोनचा कालावधी मोठा असतो. त्याच वेळी, व्यक्तीवर ईएमआयचाही भार वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखात काही उपाय सांगणार आहोत. त्यामुळे गृहकर्जाची परतफेड लवकर होईल आणि ईएमआयचा ताणही संपेल.

गृहकर्ज लवकर फेडणे महत्त्वाचे का आहे?
गृहकर्जासाठी मोठ्या रकमेचा ईएमआय असतो. ही रक्कम इतकी जास्त असते की, त्यामुळे महिन्याचे बजेट बिघडू शकते. त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करणे चांगले असते. जेव्हा गृहकर्ज घेतले जाते. तेव्हा घराची कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात. कर्जाची रक्कम परतफेड होईपर्यंत त्याची मालकी बँकेकडेच राहते.

दरवर्षी अतिरिक्त रक्कम जमा करा
गृहकर्जाची लवकर परतफेड करण्यासाठी, दरवर्षी कर्जाच्या शिल्लक रकमेच्या 5% अधिक जमा करा. असे केल्याने, मूळ रकमेची रक्कम कमी होते. त्यामुळे 20 वर्षांचे कर्ज 12 वर्षात पूर्ण होऊ शकते.

EMI ची रक्कम वाढवा
जर तुमचे मासिक उत्पन्न चांगले असेल. तर मग तुम्ही बँकेने ठरवलेल्या EMI पेक्षा जास्तीच्या रकमेचा ईएमआय वाढवू शकता. याद्वारे गृहकर्जाची परतफेड लवकर होऊ शकते. जर ईएमआय 10 टक्क्यांनी वाढवला तर त्याची परतफेड 10 वर्षांत करता येईल.

घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.

Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *