November 15, 2024

पायऱ्यांखाली ठेवू नका या वस्तू, तुमच्या प्रगतीवर होईल परिणाम

घर बांधताना किंवा घेताना आपण अनेक गोष्टी खात्री करुन घेत असतो. म्हणजे कोणत्या दिशेला दरवाजा असावा, कोणत्या दिशेला खिडकी, काय करावं, काय करु नये याची तज्ज्ञांना विचारुन खात्री करत असतो. कारण घर हे आयुष्यात एकदाच होणारी गोष्ट असते. त्यात कोणती कसर राहू नये, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे आपण पुरेशी काळजी घेतच असतो. परंतु, अनेकवेळा नजरचुकीने काही गोष्टी राहू शकतात. यासाठी आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याचा घर बांधताना किंवा घेताना फायदाच होईल.

वास्तू शास्त्रानुसार, घरात पायऱ्यांखाली कोणतीही वस्तू ठेवण्यापूर्वी, त्या वस्तूमुळे वास्तू दोष निर्माण होणार नाही या गोष्टीची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. कारण यामुळे आपल्या वास्तूवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

वास्तूशास्त्रानुसार पायऱ्यांखाली कधीही देवघर, बाथरुम, किचन करु नये. यामुळे वास्तू दोष निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर पायऱ्यांखाली बूट, चप्पलही ठेवू नये. यामुळे आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम पडू शकतो.

जर तुम्ही पायऱ्यांच्या खाली नळ लावत असाल तर त्यातून विनाकारण पाणी वाहत जाण्यावर तुमचे लक्ष असले पाहिजे. नळाची तोटी गळकी असेल तर तुमच्या घरात कधीच सुख-समृद्धी राहणार नाही.

कोणत्या दिशेला पायऱ्या असाव्यात
वास्तूशास्त्रानुसार घरात पायऱ्यांसाठी सर्वात चांगली दिशा ही दक्षिण-पश्चिम दिशा मानली जाते. त्याचबरोबर पूर्वेकडून पश्चिमकडे जाणाऱ्या पायऱ्याही बनवू शकता.

घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.

Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *