लग्न करणं, स्वतःच घर घेणं किंवा ते बांधणं हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न असतं. अनेकजण तर लग्न केल्यानंतर नव्या जोडीदारासह नव्या घरात गृहप्रवेश करतात. आपल्या भावना त्या घराशी निगडीत असतात. घर घेताना आपल्या आयुष्याची पुंजी त्यात लागलेली असते. त्यामुळे त्या घरातील प्रत्येक गोष्ट न गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची असते. हल्ली घर बांधताना किंवा घेताना त्यात फर्निचर कसं करायचं हेही सुरुवातीलाच ठरवलं जातं आणि त्याप्रमाणे बांधकामात बदल ही केले जातात. चांगलं फर्निचर असेल तर घर आकर्षक दिसतं. अगदी त्याचप्रमाणे आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे घरातील रंगसंगती म्हणजे पेंट देणं. कोणत्या खोली किंवा रुमला कोणता रंग, कोणत्या कोपऱ्यात कुठला रंग उठून दिसेल याचा थोडासा अभ्यास करुन तो निवडला तर घराचा अंतर्गत लुक एकदम जबरदस्त दिसू शकतो. अनेकवेळा घरात जास्त फर्निचर नसतानाही केवळ योग्य रंगसंगती वापरल्यामुळे घराला राजेशाही लुक मिळाल्याचे आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असेल. आता तर वास्तूशास्त्रानुसारही प्रत्येक खोलीला रंग दिला जातो. म्हणजे वास्तूशास्त्रातही घरातील अंतर्गत रंगाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे आज अनेकजण घराला रंग देताना इंटिरियर डिझायनरबरोबरच वास्तू तज्ज्ञाचाही सल्ला घेताना दिसतात. त्यामुळे आज आपण घरातील अंतर्गत रंगसंगती करताना कोणत्या रंगाचा विचार करावा याविषयी जाणून घेणार आहोत.
घराच्या भिंतींवरील पेंट किंवा पांढरा रंग त्याच्या मेकअपचे काम करते. भिंतीला पेंट केल्याने किंवा रंग दिल्याने ते केवळ सुंदरच दिसते असे नव्हे तर यामुळे घरात एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. घराच्या कोणत्या भिंतीवर कोणता रंग द्यायचा हेही समजून घेणे गरजेचे आहे. यामुळे घरात शांतता आणि समृद्धि नांदते.
१. स्वयंपाक खोली म्हणजेच किचनसाठी लाल आणि नारंगी रंग शुभ मानला जातो.
२. वॉशरुम किंवा बाथरुममध्ये पांढरा किंवा हलका निळा रंग देणे चांगले मानले जाते.
३. ड्रॉइंग रुममध्ये आकाशी, क्रिम कलर किंवा हलका पिवळा रंग देणे योग्य ठरते
४. देवघरात किंवा जिथे पूजा होते त्याठिकाणी पिवळा आणि हलका निळा रंग शुभ मानला जातो.
५. अभ्यासाच्या जागी म्हणजे स्टडी रुममध्ये नेहमी हिरवा रंग असला पाहिजे. कारण हिरवा रंग हा समृद्धिचे प्रतीक मानला जातो.
६. बेडरुमचा रंग गुलाबी, आकाशी, लाइट ग्रीन आणि फिकट रंगाचा असला पाहिजे. नातेसंबंधात मधुरता आणण्यासाठी आणि मनाच्या शांतीसाठी हे सर्व रंग चांगले मानले जातात.
घराला रंग देताना किती छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते, हा लेख वाचल्यानंतर लक्षात आलं असेल. घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.