November 15, 2024

होम लोन घ्यायचंय? मग ही कागदपत्रं जवळ बाळगा

घर ही वारंवार खरेदी करण्यासारखी गोष्ट नाही. प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीला स्वतःच घर असावं अशी इच्छा किंवा त्याचं एक स्वप्न असतं. घराच्या किंमतीही इतक्या असतात की आपल्या बचतीतूनही आपण संपूर्ण रक्कम उभा करु शकत नाही. किंवा पैसे असले तरी टॅक्स बेनिफिटसाठी अनेक जण होम लोन म्हणजे गृहकर्जाला प्राधान्य देतात. सर्वच बँका होम लोन देण्यासाठी तत्पर असतात. परंतु, यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. काहीजणांकडे काही कागदपत्रे नसूही शकतात, किंवा कालबाह्य ठरलेलीही असू शकतात. पहिल्यांदाच होम लोन घेत असल्यामुळे अनेकांना तर ऐनवेळी कागदपत्रे जमा करताना घाम येतो. ग्राहकांची अशी तारांबळ उडू नये म्हणून आम्ही आज होमलोनसाठी आवश्यक असलेल्या दस्तऐवज म्हणजेच कागदपत्रांविषयी माहिती देणार आहोत.
होम लोनसाठी अर्ज करतेवेळी सादर करावी लागणारी कागदपत्रे सर्व बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांमध्ये (HFC) कमी-अधिक प्रमाणात सारखीच असतात. तथापि, तुमच्या होम लोनचा प्रकार, क्रेडिट प्रोफाइल इत्यादींवर अवलंबून काही आवश्यकता वेगळ्याही असू शकतात. येथे, आम्ही काही मुख्य होम लोनसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देत आहेत जे तुम्हाला कर्ज अर्जाच्या वेळी सबमिट करणे आवश्यक आहे.

नोकरदार आणि बिगर नोकरदार अर्जदारांसाठी होम लोनसाठीची कागदपत्रे

1. योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला होम लोन अर्ज
2. ओळखीचा पुरावा: (खालीलपैकी कोणतेही एक)
* पॅन कार्ड
* पासपोर्ट
* आधार कार्ड
* मतदान ओळखपत्र
* वाहन परवाना

3. वयाचा पुरावाः (खालीलपैकी कोणतेही एक)
* आधार कार्ड
* पॅन कार्ड
* पासपोर्ट
* जन्म दाखला
* दहावीची गुणपत्रिका
* बँक पासबूक
* वाहन परवाना

4. राहण्याचा पुरावा / ऍड्रेस प्रुफः (खालीलपैकी कोणतेही एक)
* बँक पासबूक
* मतदान ओळखपत्र
* रेशन कार्ड
* पासपोर्ट
* यूटिलिटी बिल (टेलिफोन बिल, लाइट बिल, पाणी बिल, गॅस बिल)
* एलआयसी पॉलिसी पावती
* कोणत्याही मान्यताप्राप्त सार्वजनिक प्राधिकरणाचे पत्र ज्यातून अर्जदाराचा पत्ता व्हेरिफाय होऊ शकतो

5. उत्पन्नाचा पुरावाः
नोकरदारांसाठीः
* फॉर्म 16
* नियोक्ता/कंपनीकडून प्रमाणित पत्र
* मागील दोन महिन्यांची पे स्लिप
* इंक्रीमेंट किंवा प्रमोशन पत्र
* मागील 3 वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)
* उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय, नोकरदाराने जर कुठे गुंतवणूक केली असेल त्याचा पुरावा (जसे एफडी, शेअर आदी) आणि स्वतःचे पासपोर्ट आकाराचे फोटो जमा करावे लागतील.

बिगर नोकरदार / स्वयंरोजगार किंवा व्यावसायिकांसाठीः
* मागील 3 वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न
* कंपनी/फर्मची बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट स्टेटमेंट (सीएकडून प्रमाणित)
* बिजनेस लायन्ससची माहिती (किंवा इतर कोणतेही समतुल्य कागदपत्रे)
* प्रोफेशनल प्रॅक्टिसचे लायसन्स (डॉक्टर, सल्लागार आदींसाठी)
* व्यवसाय सुरु करण्याचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (दुकान, कारखाना किंवा इतर आस्थापनांसाठी)
* व्यवसाय पत्त्याचा पुरावा

6. मालमत्ता किंवा संपत्तीची कागदपत्रे:
* डेव्हलपरला दिलेल्या रकमेची पावती (नवीन घर खरेदी प्रकरणासाठी)
* अलॉटमेंट लेटर/ बायर ऍग्रीमेंट
* मागील प्रॉपर्टीच्या कागदपत्रांसह टायटर ऍग्रीमेंट (घराच्या पुर्नविक्रीसंबंधी)
* खरेदी / सेल ऍग्रीमेंटची एक प्रत
* विक्रेत्यांसाठी सुरुवातीच्या पेमेंटची पावती
* प्लॉटचा टायटल ऍग्रीमेंट (घर बांधणीच्या बाबतीत)
* सिव्हिल इंजिनिअर / आर्किटेक्टकडून कन्स्ट्रक्शन एस्टिमेट
* स्थानिक अधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आलेल्या प्लॅनची प्रत
* प्रॉपर्टीवर कोणतेही अतिक्रमण नसल्याचा पुरावा

7. इतर कागदपत्रे:
* सर्व अर्जदार/ सहअर्जदारांचे पासपोर्ट आकाराचे फोटो
* स्वतःच्या योगदानाचा पुरावा
* मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट ज्यामध्ये सध्याच्या कर्जाच्या परतफेडीच्या नोंदी असाव्यात (जर कर्ज असेल तर)
* हप्ते, थकबाकी रक्कम, सिक्युरिटी, उर्वरित कर्जाचा कालावधी इत्यादींसह व्यक्ती आणि व्यावसायिक संस्थांचे वर्तमान कर्ज तपशील.
* प्रोसेसिंग शूल्क चेक (होम लोन देत असलेल्या संस्थेच्या नावे)

नोकरदारांसाठी:
* रोजगार करार / नियुक्ती पत्र, जर सध्याची नोकरी एक वर्षापेक्षा कमी असेल

बिगर नोकरदार/ व्यावसायिकांसाठी:
* बिझनेस प्रोफाइल
* फॉर्म 26 AS
* व्यवसाय संस्था ही कंपनी असल्यास, CA/CS द्वारे प्रमाणित वैयक्तिक शेअरहोल्डिंगसह संचालक आणि भागधारकांची यादी
* व्यवसाय संस्था भागीदारी फर्म असल्यास भागीदारी करार
* कंपनीचे आर्टिकल्स ऑफ एसोसिएशन आणि मेमोरँडम

घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.

Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *