साधारणपणे, तुम्ही घर/फ्लॅट, प्लॉट खरेदीसाठी किंवा बांधकाम/नूतनीकरणासाठी होम लोन घेता. काही वेळा घर वाढवण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठीही होम लोन घेतले जाते. येथे आम्ही तुम्हाला होम लोनविषयी सर्व आवश्यक माहिती देणार आहोत.
तुम्ही किती कर्ज घेऊ शकता?
गृहकर्ज किंवा होम लोनची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, तुम्ही किती कमावता आणि त्यानुसार बँक किती कर्ज देऊ शकते याचे मूल्यांकन करा. होम लोन मिळवण्याची तुमची क्षमता तुमच्या परतफेड क्षमतेवर अवलंबून असते. तुमची मासिक कमाई, खर्च आणि कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न, मालमत्ता, दायित्वे, उत्पन्नातील स्थिरता यासारख्या मुद्द्यांवर ते अवलंबून असते.
तुम्ही होम लोनची वेळेवर परतफेड करू शकाल की नाही हे बँका आधी पाहतात. दर महिन्याला तुमच्या हातात जितके जास्त पैसे येतील, तितकी तुमच्या गृहकर्जाची रक्कम वाढेल. साधारणपणे, बँक किंवा कर्ज देणारी कंपनी तुम्ही तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 50% गृहकर्जाचा हप्ता म्हणून भरण्यास सक्षम आहात की नाही हे तपासते.
कर्जाची रक्कम गृहकर्जाचा कालावधी आणि व्याजदरावर देखील अवलंबून असते. याशिवाय बँका गृहकर्जासाठी वयोमर्यादाही निश्चित करतात.
तुम्ही जास्तीत जास्त किती होम लोन घेऊ शकता?
घर किंवा फ्लॅटच्या किंमतीच्या 10-20% पर्यंत डाउन पेमेंट करावे लागेल. हे तुमचे स्वतःचे योगदान असते.
यानंतर, मालमत्तेच्या मूल्याच्या 80-90 टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. यात नोंदणी, हस्तांतरण आणि मुद्रांक शुल्क यांसारख्या शुल्कांचाही समावेश होतो.
जरी कर्ज देणार्या संस्थेने तुम्हाला जास्त रक्कम गृहकर्ज म्हणून मंजूर केली असली तरी, तुम्ही संपूर्ण रक्कम कर्ज म्हणून घेतलीच पाहिजे असे नाही.
मालमत्ता खरेदी करताना, तुम्ही जास्तीत जास्त डाउन पेमेंट केले पाहिजे जेणेकरून कर्जाचा बोजा कमीत कमी राहील. होम लोन देणारी बँक तुमच्याकडून दीर्घ मुदतीसाठी भरपूर व्याज आकारते हे लक्षात ठेवा.
होम लोन मंजूरी आणि डिस्बर्समेंट म्हणजे काय?
तुम्ही दिलेल्या कागदपत्रांनुसार, तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे बँका ठरवतात. गृहकर्जाची रक्कमही यावर अवलंबून असते.
जर बँकेने तुमचा अर्ज स्वीकारला असेल आणि त्यानुसार गृहकर्ज देण्याचा निर्णय घेतला असेल, तर मंजुरी पत्रात गृहकर्जाची रक्कम, कालावधी आणि व्याजदर इत्यादींची माहिती असते. यामध्ये कर्जाच्या स्थितीची माहिती होते.
जेव्हा कर्जाची रक्कम तुमच्या हातात येते तेव्हा त्याला डिस्बर्समेंट म्हणतात. तांत्रिक, कायदेशीर आणि मूल्यांकन संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे प्रत्यक्षात होते.
तुम्ही सँक्शन लेटर / मंजुरी पत्रात नमूद केलेल्या रकमेपेक्षा कमी कर्ज घेण्याचा निर्णय घेऊ शकता. कर्ज घेताना, तुम्हाला अॅलॉटमेंट लेटर, टायटल डीडची छायाप्रत, विक्री करार आणि बोजा प्रमाणपत्र द्यावे लागेल.
कर्जाची रक्कम तुमच्या हातात आल्याच्या दिवसापासून व्याज आकारले जाते.
होम लोनची रक्कम तुमच्या हातात कशी येईल?
होम लोन तुम्हाला एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये दिले जाते. बांधकामाधीन म्हणजेच अंडर कन्स्ट्रक्शन मालमत्तेच्या बाबतीत, बांधकामाच्या प्रगतीनुसार कर्जाची रक्कम वितरित केली जाते.
या प्रकारच्या मालमत्तेच्या बाबतीत, तुम्ही कर्ज देणाऱ्या बँकेशी करार करू शकता, जेथे बांधकामानुसार होम लोनची रक्कम बिल्डरला दिली जाईल. रेडी टू मुव्ह मालमत्ता / प्रॉपर्टी तयार असल्यास, कर्जाची रक्कम एकरकमी मिळू शकते.
घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या