November 15, 2024

ही वनस्पती योग्य दिशेला लावा, पडेल पैशाचा पाऊस, जाणून घ्या योग्य मार्ग

Money Plant: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली रोपं आणि वनस्पतींमध्ये सकारात्मक उर्जा संचार करत असते. हे लावल्याने सुख-समृद्धीसोबतच लक्ष्मीचाही वास्तूमध्ये वास राहतो. या वनस्पती किंवा रोपांपैकी एक म्हणजे मनी प्लॅंटचे रोप.

मनी प्लांटसाठी योग्य दिशा
वास्तुशास्त्रात अशा अनेक झाडांचा, रोपांचा आणि वनस्पतींचा उल्लेख करण्यात आला आहे, जे घरामध्ये योग्य दिशेने लावल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यासोबतच सुख-समृद्धी राहते आणि देवी लक्ष्मीचे आगमन होते. वास्तू तज्ज्ञ सांगतात की, काही वनस्पती घराच्या आत लावणे शुभ मानले जाते तर काही घराबाहेर लावणे शुभ मानले जाते.

वास्तूमध्ये अशाच मनी प्लांटचा उल्लेख आहे. हे घरामध्ये लावल्याने सौंदर्यात वाढ होते आणि घरात लावणे शुभही मानले जाते. याला घरामध्ये योग्य दिशेने लावल्यास व्यक्तीच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. मनी प्लांट लावल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही, असेही सांगितले जाते. त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो. घरी मनी प्लांट लावण्याचे योग्य नियम जाणून घ्या.

मनी प्लांट लावण्यासाठी योग्य नियम

– घराच्या सजावटीसाठी अनेक रोपं आणि वनस्पतींचा उल्लेख केला आहे. पण वास्तूनुसार काही रोपं घराच्या सजावटीसोबत सुख-समृद्धी देतात. यापैकी एक म्हणजे मनी प्लॅंटचे रोप. अनेकदा तुम्ही ही वनस्पती घरांमध्ये लावलेली पाहिली असेल. हे घरामध्ये लावल्याने देवी लक्ष्मी घरावर सदैव राज्य करते. याचा वापर केल्याने घरात धनाची आवक वाढते.

ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावल्याने नात्यात गोडवा येतो. हे लावताना काही नियमांचे पालन केल्यास त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळतात.

– चोरून आणून मनी प्लांट घरात लावणे शुभ मानले जाते असे अनेकवेळा आपण ऐकले असेल. पण चोरी करून मनी प्लांट कधीही लावू नये असे वास्तू तज्ज्ञ सांगतात. त्यापेक्षा पैशाने खरेदी करून लावलेला मनी प्लांट शुभ मानला जातो. हे पूर्ण परिणाम देते.

– अनेक वेळा लोक मनी प्लांट वाढण्यासाठी तसेच सोडून देतात. मनी प्लांट कधीही जमिनीला स्पर्श करू नये असे म्हणतात. त्याच्या वेलींना जमिनीला अजिबात स्पर्श करू देऊ नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे म्हटले जाते की, मनी प्लांट देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. अशा स्थितीत त्याला जमिनीवरून स्पर्श करणे देवी लक्ष्मीचा अपमान मानले जाते.

घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.

Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *