April 2, 2025

वास्तुच्या या खास टिप्समुळे घरात वाढेल सुख-शांती

वास्तुशास्त्रानुसार अनेक वेळा घरातील वास्तुदोषांमुळे घरातील सुख-समृद्धी आणि चांगल्या कामात अनेक अडथळे येतात. सातत्याने येणारे अपयश, वाद-विवाद अशा विविध नकारात्मक घटनांमुळे कुटुंबातील व्यक्ती नैराश्यात जातात. पण वास्तूमध्ये छोटेसे बदल केल्यास त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येतात. आज आपण याबाबत अधिक जाणून घेणार आहोत.

असे मानले जाते की, घरातील उर्जेच्या पाच घटकांपैकी अग्नि, जल, पृथ्वी, वायू आणि अवकाश यापैकी एकही असंतुलित असेल तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात.

अग्नि तत्व
सात धावत्या घोड्यांचे चित्र आग्नेय दिशेला लावल्याने घरातील अग्नि तत्व संतुलित राहते असे मानले जाते. धनप्राप्तीसाठी तुम्ही उत्तर दिशेला हिरवी रोपे ठेवू शकता.

घराची उत्तर-पूर्व दिशा
घराच्या ईशान्य दिशेला कचरा आणि जुन्या वस्तू ठेवल्यानेही माणसाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, या दिशेला स्टोअर रूम बनवू नका.

नकारात्मक ऊर्जा कशी दूर करावी
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या मुख्य गेटवर किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावा आणि त्यावर नियमितपणे जल अर्पण करा आणि पूजा करा.

कोणत्या दिशेने झोपायचे
वास्तूनुसार घरातील कोणत्याही सदस्याला निद्रानाशाची समस्या असल्यास त्या व्यक्तीने दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपावे. यामुळे झोप न येण्याची समस्या दूर होईल.

ताजी हवा
सकाळी काही वेळ घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा, जेणेकरून ताजी हवा आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकेल.

सूर्य प्रकाश
असे मानले जाते की, घरात पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण असते.

मनी प्लांट
वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला निळ्या रंगाच्या बाटलीत मनी प्लांट लावावा. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहते.

घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.

Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *