वास्तूशास्त्रानुसार जर वास्तू चांगली असेल तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. पण वास्तू दोष असल्यास घरात क्लेश, बाधा आणि आजारपण कायम राहते. हिंदू धर्मावर श्रद्धा असणारे लोक वास्तूमध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन करतात. वास्तूशास्त्रानुसार, घरात काही मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते.
सुख-समृद्धी आणणाऱ्या मूर्ती
आज आम्ही तुम्हाला वास्तूनुसार अशा मूर्तींबाबत सांगणार आहोत, ज्या घरात ठेवल्याने सुख-समृद्धीत वाढ होते.
श्री गणेशाची मूर्ती
घरात श्री गणेशाची मूर्ती असणे शुभ मानले जाते. जर घरात एखादा वास्तू दोष असेल, तर गणेशाची मूर्ती मुख्य दरवाज्यावर लावली पाहिजे.
हत्तीची मूर्ती
हत्तीला धन आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. ही मूर्ती घरात ठेवल्याने लक्ष्मी मातेचा वावर कायम राहतो.
गाय-वासरुची मूर्ती
वासराला दूध पाजवणाऱ्या गाईची मूर्ती ठेवल्याने अपत्य प्राप्तीबरोबरच मानसिक शांतता मिळते.
माशाची मूर्ती/आकृती
माशाला वास्तूबरोबरच फेंगशुईमध्येही विशेष मानले जाते. तुम्ही माशाच्या आकृती किंवा मूर्तीच्या जागी फिश ऍक्वेरियमही ठेवू शकता.
कासव
कासव लक्ष्मी मातेसाठी विशेष असल्याचे मानले जाते. घरात उत्तर दिशेला कासवाची मूर्ती ठेवल्याने सुख-समृद्धीत वाढ होते.
घोड्याची मूर्ती
वास्तूशास्त्रानुसार, घरात पळणाऱ्या घोड्याची मूर्ती ठेवल्याने जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते.
पोपटाची मूर्ती
वास्तूनुसार, मुलांच्या खोलीत पोपटाची मूर्ती लावल्याने मुले मन लावून अभ्यास करतात.
घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.