November 15, 2024

प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही दीर्घ काळासाठी केली जाणारी गुंतवणूक असते. म्हणजे आपण एकदा एखादे घर खरेदी केल्यानंतर लगेच पुन्हा या प्रक्रियेतून जात नाही. साधारणपणे लोकांकडे रिअल इस्टेटचा जास्त अनुभव नसतो. त्याचबरोबर पहिल्यांदा रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांकडे जास्त अनुभव नसल्याने त्यांच्यासाठी काही धोकेही असतात. चुकून आपण अशी प्रॉपर्टी किंवा मालमत्ता खरेदी करू शकता जी तुमच्यासाठी फायदेशीर नाही. तुम्ही प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल, तर त्यावेळी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. या गोष्टी खासकरून त्यांच्यासाठी चांगल्या आहेत जे पहिल्यांदाच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत आहेत किंवा खरेदी करत आहेत.

रेरा नोंदणी
प्रॉपर्टी शोधत असताना, आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, हा प्रकल्प रिअल इस्टेट रेग्युलेटरी आथॉरिटी (RERA) नोंदणीकृत आहे की नाही. RERA क्रमांक आणि मंजुरीची पडताळणी/व्हेरिफाय ऑनलाइन किंवा स्थानिक पालिका अधिकाऱ्यांमार्फत करू शकता.

इतर खर्चाचाही करा विचार
प्रॉपर्टी निवडताना मासिक देखभाल शुल्क, सुरक्षा आणि सोशल क्लब यासारख्या सुविधा, वीजपुरवठा, पाणी शुल्क आदी गोष्टींची तुलना करावी. हे खर्च आपल्याला नंतर महागात पडू शकतात. हे खर्च आपल्या बजेटला अनुकूल आहे की नाही ते तपासणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर पूर्ण झालेल्या किंवा निर्माणाधीन प्रकल्पांच्या बाजार मूल्याची तुलना करावी.

प्रॉपर्टीचा शोध सुरू करण्यापूर्वी बजेट तयार करणे आवश्यक आहे. ब्रोकर किंवा एजंट आपल्याला जास्त खर्च करण्यास प्रवृत्त करू शकतात. यासाठी ते आपल्याला उच्च परतावा देण्याचे अमिष दाखवू शकतात. परंतु यामुळे आपल्या होम लोनची परतफेड करण्यात चूक झाल्यामुळे होणारे नुकसान भरून निघणार नाही.

टॅक्स वाचवण्याचाही करा प्रयत्न
प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना सरकार आकर्षक गृहकर्ज प्रोत्साहन देणार आहे. आपल्याला पीएम आवास योजनेअंतर्गत कमी व्याजदराचा लाभ मिळतो. याशिवाय, कलम २४ सी अंतर्गत गृहकर्जाच्या व्याजदरावर आणि कलम ८० सी अंतर्गत मुद्दल पेमेंटवर नोंदणी आणि मुद्रांक शुल्कावरही कर लाभ मिळेल. महत्त्वाचं म्हणजे डेव्हलपरशी कोणताही करार करण्यापूर्वी कागदपत्रे नीट वाचा.

घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.

Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *