घर बांधताना किंवा विकत घेताना अनेकजण त्यांच्या देवघराची जागात आधी निश्चित करतात. घरातून नकरात्मकता आणि वास्तू दोष दूर करण्यासाठी आपल्या घरात देवघर तयार करतात. पण अनेकवेळा माहिती अभावी किंवा अर्धवट माहितीमुळे आपल्या हातून चुका होतात. त्यामुळे सर्व गोष्टी चांगल्या करुनही त्याचे विपरित परिणाम आपल्याला दिसून येतात. मग घरात वाद-विवाद, पैशाची तंगी, शारीरिक-मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. पण काळजी काय घ्यायची याची आधीच पूर्ण माहिती मिळाली तर आपल्याला त्याचा अवलंब करता येतो. हिंदू धर्मग्रंथांनुसार, देवघरात मूर्ती ठेवण्याचे काही नियम आहेत. हे नियम काय आहेत ते आपण आज जाणून घेऊयात.
खंडीत किंवा भग्नावस्थेतील मूर्ती
पूजा स्थळ किंवा देवघरात खंडीत किंवा मोडतोड झालेली मूर्ती ठेवू नये. देवघरात अशी मूर्ती ठेवणे अशुभतेचे कारण ठरते.
रौद्र रुप
देवाची रौद्र रुप किंवा रागातील मूर्ती ठेवू नये. देवघरात नेहमी सौम्य आणि मुद्रेवर हास्य असलेली देवाची मूर्ती असावी.
पाठ दाखवणारी मूर्ती
देवघरात श्री गणेशाची मूर्ती त्यांची पाठ दिसेल अशा पद्धतीने ठेवू नये. धार्मिक मान्यतांनुसार, श्री गणेशाच्या पाठीवर दरिद्रता वास करते.
दोन मूर्ती
देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती किंवा फोटो नसावेत.
शिवलिंग
जर देवघरात शिवलिंग ठेवत असाल तर लक्षात ठेवा की शिवलिंगाचा आकार हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठा नसावा.
लक्षात ठेवा की, देवघरात दोन शाळिग्राम, दोन शिवलिंग, दोन गणेशाची मूर्ती आणि दोन सूर्य नसावेत.
ही माहिती केवळ धर्मग्रंथ आणि विविध माध्यमांत आलेल्या वृत्तावर आधारित आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.