मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबाची सर्वात मोठी समस्या म्हणजे घराचा EMI भरणे. त्यातही अनेकवेळा ज्या बँकेकडून कर्ज मंजूर केले जाते त्या बँकेने व्याजदर वाढवला तर ईएमआय वाढतो म्हणजेच तो महाग होतो. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर आता आम्ही तुम्हाला तुमच्या पसंतीच्या बँकेत गृहकर्ज हस्तांतरित / ट्रान्सफर करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.
असे होईल लोन ट्रान्सफर
तुम्हाला तुमचे गृहकर्ज ट्रान्सफर करायचे असल्यास, प्रथम तुम्हाला ज्या बँकेत ट्रान्सफर करायचे आहे ती बँक निवडावी लागेल. त्यानंतर तुम्हाला जुन्या बँकेत ‘फोर क्लोजर’साठी अर्ज द्यावा लागेल. त्यानंतर अकाऊंट स्टेटमेंट व मालमत्तेची कागदपत्रे जुन्या बँकेतून घ्यावी लागतात. तसेच, तेथून एनओसी घ्यावी लागते, जी नवीन बँकेत गृहकर्ज मंजूर करण्यासाठी वापरली जाते. जेव्हा तुम्ही तुमचे कर्ज हस्तांतरित करता तेव्हा तुम्हाला कर्जाच्या रकमेच्या 1% प्रक्रिया शुल्क (प्रत्येक बँकेचे नियम वेगवेगळे आहेत) म्हणून भरावे लागते.
नवीन बँकेत द्यावे लागतील ही कागदपत्रे
1. केवायसीची कागदपत्रे
2. प्रॉपर्टी / मालमत्तेची कागदपत्रे
3. लोन बॅलन्स / शिल्लक कर्ज
4. व्याजाची कागदपत्रे
5. अर्ज आणि नवीन बँकेचे सहमती पत्र
तुमच्याकडे येथे सांगितलेली सर्व कागदपत्रे असल्यास, तुम्ही तुमचे गृहकर्ज तुमच्या पसंतीच्या बँकेत सहजपणे हस्तांतरित करू शकता. काही बँका आपल्या गृहकर्जाचे व्याजदर कमी करण्याची घोषणा करतात. त्याच वेळी, मर्यादित कालावधीसाठी अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) देखील माफ करतात. अशावेळी या संधीचा ग्राहकांना लाभ घेता येतो.
घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.