November 25, 2024

जाणून घ्या देवघर बेडरूमच्या आत का नसावे

वास्तुशास्त्रानुसार घराच्या रचनेचा थेट परिणाम घरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर होतो. घरातील खोली, स्वयंपाकघर, बाथरुम आणि बेडरुम वास्तुनुसार बनवलेले नसल्यास नकारात्मक ऊर्जा घरात राहते. त्याचप्रमाणे कुटुंबाच्या समृद्धीसाठी घरातील मंदिराचे स्थान वास्तुनुसार असणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत तुम्ही काही चूक करत असाल तर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

देवघरासाठी आवश्यक वास्तू टिप्स
वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे. या दिशेला ईशान्य कोन असेही म्हणतात.

– देव घर बांधताना हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की, मंदिर बेडरूमच्या आत नसावे.

– वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर किंवा बाथरुम जवळ देवघर असणे शुभ मानले जात नाही. याचा परिणाम कौटुंबिक जीवनावर होतो.

– घरात असलेले मंदिर जमिनीवर ठेवू नये. मंदिराची उंची एवढी असावी की परमेश्वराच्या पायांची आणि छातीची पातळी समान असेल.

– घरामध्ये देवघर बनवताना देवघराचा रंग काळा नसावा याकडेही लक्ष द्यावे. त्याचा रंग पांढरा, हलका क्रीम किंवा हलका पिवळा असावा.

– घरातील देवघरात पूर्वजांची फोटो किंवा चित्रे ठेवू नयेत. ते अशुभ मानले जाते.

– घरात असलेल्या देवाच्या मूर्ती कधीही जमिनीवर ठेवू नयेत.

– सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणेशाची मूर्ती नेहमी देवी लक्ष्मीच्या डाव्या बाजूला ठेवावी.

– पूजा नेहमी आसन अंथरुण त्यावरुनच करावी.

घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com

Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *