प्रत्येकाला आपल्या जीवनात सुख-समृद्धी, प्रगती आणि प्रत्येक व्यक्तीबरोबर चांगले संबंध राहावेत असे वाटत असते. परंतु, अनेकवेळा भरपूर प्रयत्न करुनही दुःख आणि अडचणी आपल्या जीवनावर वर्चस्व राखतात. वास्तूशास्त्रानुसार या अडचणींचे कारण अनेकवेळा आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि घराच्या रचनेत असते. वास्तू शास्त्र ही निसर्गाच्या पाच वस्तूंना योग्य स्थितीत ठेवण्याची पद्धत आहे. जी पॉझिटिव्ह एनर्जीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या आजूबाजूचे वातावरण व्यवस्थित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते. ज्यामुळे आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणि आनंद देण्याची क्षमता ठेवते. चला तर मग जाणून घेऊयात घरासाठी महत्त्वाच्या वास्तू टिप्स.
1. घराच्या प्रवेशद्वारावर तुळशीचे रोपटे ठेवा. तुळशीचे रोपटे भगवान विष्णूशी संबंधित आहे आणि त्याचबरोबर याचे अनेक औषधी फायदे देखील आहेत. हे रोपटे निगेटिव्ह एनर्जी शोषून घेऊन पॉझिटिव्ह एनर्जी वाढवते. तुळशीचे रोपटे घराच्या पूर्व दिशेला ठेवले पाहिजे. त्याशिवाय ते उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला (ईशान्य) खिडकीजवळही ठेवले तरी चालते.
2. उत्तर दिशेला डोके करुन झोपे नये. उत्तर दिशेकडे डोके करुन झोपले तर रात्री वाईट स्वप्ने पडतात आणि त्यामुळे आपली झोप खराब होते. त्याचबरोबर रक्तविकारासारख्या समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो.
3. उत्तर आणि पूर्व दिशेचे दरवाजे आणि खिडक्या दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या तुलनेत मोठे असले पाहिजेत. दक्षिण आणि पश्चिम दिशांना खिडक्या करु नयेत.
4. भिंतीवर नेहमी चालू स्थितीतील घडयाळ असावे. ते पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला लावले पाहिजे. या दिशांना घडयाळ लावल्याने नवनवीन संधी प्राप्त होतात. घरात हिरव्या रंगाचे घडयाळ लावू नये. यामुळे हातात आलेल्या संधी जावू शकतात.
5. अवजड फर्निचर दक्षिण, पश्चिम दिशेच्या भिंतीजवळ ठेवले पाहिजे. फर्निचरमध्ये लाकडाचा वापर जास्त असावा. प्लास्टिकपासून बनलेल्या वस्तूंचा उपयोग करु नये. त्याचबरोबर धातूंनी बनलेल्या फर्निचरचाही वापर करु नये. हे फर्निचर आपल्या चारी दिशांना चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जीमध्ये वाढ होते.
6. प्रवेशद्वाराजवळ चप्पल स्टँड नसावे. यामुळे निगेटिव्ह एनर्जी आकर्षित होते. चप्पल स्टँड हे पश्चिम आणि दक्षिण पश्चिम कोपऱ्याकडे असावे. चुकूनही ते उत्तर, दक्षिण-पूर्व (आग्नेय) आणि पूर्व दिशेकडे नसावे.
7. घरावरील नेमप्लेट नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावी. ही नेमप्लेट घरातील लोकांचे फर्स्ट इम्प्रेशन दाखवते.
8. मुख्य प्रवेशद्वारातून लोक घरात येत असतात. त्यांच्याबरोबर विविध प्रकारच्या ऊर्जा पण याच मार्गाने घरात प्रवेश करतात. घरातील इतर दरवाज्यांच्या तुलनेत घरातील मुख्य प्रवेशद्वार मोठे आणि लाकडी असले पाहिजे. मुख्य प्रवेशद्वार हे उत्तर, उत्तर-पूर्व (ईशान्य) किंवा पश्चिम दिशेला असावे.
9. घराच्या मध्यभागी चुकूनही पिलर, पायऱ्या नसाव्यात. त्यामुळे धन हानी होऊ शकते.
10. घराची दक्षिण, पश्चिम भिंत ही उत्तर आणि पूर्वेच्या भिंतीच्या तुलनेत उंच आणि मोठी असली पाहिजे. घराचा उत्तरपूर्व कोपरा हे ऊर्जेचे उगम स्थान असते.
घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.