वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोषापासून घराचे रक्षण करण्यासाठी केवळ योग्य दिशा असणे आवश्यक नाही. त्याचबरोबर घराच्या भिंतींवरही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. वास्तू तज्ज्ञ सांगतात की, घराच्या भिंतींचा रंग वास्तुनुसार नसेल तर त्या घरात आर्थिक समस्या निर्माण होतात. यानुसार, प्रत्येक दिशेनुसार भिंतीचा रंग ठरवा. घराच्या बाहेरील भिंतींसाठी आपण हलका निळा, पांढरा, पिवळा, केशरी, क्रिम आणि इतर हलके रंग वापरावेत आणि खोलीच्या भिंतींचा रंगही वास्तुनुसार निवडला पाहिजे. असे म्हणतात की, रंगांचा आपल्या जीवनावरही खूप परिणाम होतो.
वास्तूनुसार भिंतींच्या रंगानुसार पडदे, चादरी आणि उशांचा रंग निवडला पाहिजे. या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास जीवनातील समस्या टाळता येऊ शकतात.
उत्तर दिशेची भिंत
वास्तूनुसार घराच्या उत्तर दिशेला जल तत्वाचे वर्चस्व असते. याला धन आणि लक्ष्मीचे स्थान असेही म्हणतात. म्हणूनच ती जागा स्वच्छ, पवित्र आणि रिकामी ठेवली पाहिजे. या भिंतीच्या सजावटीसाठी हलका हिरवा किंवा पिस्ता हिरवा रंग वापरा. तथापि, उत्तरेकडील भिंतीसाठी आकाशी निळा रंग देखील वापरला जाऊ शकतो. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. या भिंतीवर गडद रंग वापरल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. इतकंच नाही तर जीवनात अनेक संकटेही येऊ शकतात.
उत्तर पूर्व दिशेची भिंत (ईशान्य)
उत्तर पूर्व दिशेला ‘ईशान्य कोन’ असेही म्हणतात. या दिशेला देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर ईशान्य ही भगवान शंकराची दिशा मानली जाते. या दिशेसाठी आकाशी, पांढरा किंवा जांभळा रंग निवडावा. या भिंतीसाठी पिवळा रंगही वापरता येतो. कारण येथे देवतांचे वास्तव्य असते.
पूर्व दिशेची भिंत
वास्तूनुसार घराची पूर्वेकडील भिंत पांढरी किंवा हलकी निळी असावी.
दक्षिण-पूर्व दिशेची भिंत (आग्नेय)
वास्तूनुसार घराचा आग्नेय भाग अग्नि तत्वासाठी मानला जातो. म्हणूनच ही भिंत सजवण्यासाठी केशरी, पिवळा किंवा पांढरा रंग वापरा. त्याला ‘दक्षिण कोन’ असेही म्हणतात.
दक्षिण दिशेची भिंत
दक्षिण दिशेसाठी केशरी रंगाचा वापर केल्याने ऊर्जा आणि उत्साह कायम राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे. तर दुसरीकडे या दिशेला बेडरूम असेल तर गुलाबी रंगही करता येतो.
दक्षिण पश्चिम दिशेची भिंत
दक्षिण-पश्चिम भिंत किंवा खोलीला ‘नैर्य कोन’ म्हणतात. येथे तपकिरी, ऑफ-व्हाइट किंवा हिरवा रंग वापरा.
पश्चिम दिशेची भिंत
पश्चिम भिंतीसाठी निळ्या रंगाची शिफारस केली जाते. इथे निळ्यासोबतच पांढरा रंगही थोडा वापरता येतो. ही दिशा पाण्याची देवता वरुणदेवासाठी मानली जाते.
उत्तर-पश्चिम दिशेची भिंत
उत्तर-पश्चिम भिंतीसाठी हलका तपकिरी, पांढरा किंवा क्रीम रंग वापरला जाऊ शकतो.
घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.