वास्तू शास्त्रानुसार, घरात सकारात्मक ऊर्जेचा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रसार झाल्याने जीवनात सुख-समृद्धीत वाढ होते. घरात सकारात्मक ऊर्जेचा स्तर वाढवण्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला वास्तू संबंधीच्या काही अशा टिप्स सांगणार आहोत ज्या निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा दूर करुन सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करतील.
तुळशीचं रोपटं
घराच्या प्रवेशद्वारावर तुळशीचे रोप लावून त्याची पूजा केली पाहिजे. असं म्हटलं जातं की, हे रोपटं नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन सकारात्मक ऊर्जा वाढवते.
चप्पल, बूटांचं स्टँड
अनेक लोक घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चप्पल किंवा बूटाचे स्टँड लावतात. परंतु, हे स्टँड दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवले पाहिजे. त्याचबरोबर चुकूनही हे स्टँड उघडे ठेवू नये.
स्वच्छ, टीपटाप घर
घर नेहमी स्वच्छ आणि टीपटाप ठेवल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहत असतो. अशावेळी अनावश्यक असलेल्या वस्तू घरातून हटवल्या पाहिजेत.
तिजोरीची दिशा
जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरु राहावा. तर घरातील तिजोरीचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवले पाहिजे.
सुगंधित वस्तू
घरात सकारात्मक ऊर्जेसाठी दररोज सकाळ-संध्याकाळ काही वेळ सुगंधित वस्तू उदा. उदबत्ती, धूपसारख्या गोष्टी घरातील एका कोपऱ्यात ठेवावे. हा सुगंध सगळीकडे पसरायला हवा.
दरवाजे आणि खिडक्या
घरात नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी दरवाजे आणि खिडख्या आतील बाजूने उघडणाऱ्या असाव्यात.
श्री गणेशाची प्रतिमा
घराच्या मुख्य दरवाज्यावर श्री गणेशाची प्रतिमा लावली पाहिजे. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
घर, जागा, फर्निचर, इंटिरियर डिझाइन, रिअल इस्टेट आणि वास्तूशास्त्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा aplijaga.com.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे. यातील संपूर्ण माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. यासाठी aplijaga.com जबाबदार नाही. aplijaga.com वर प्रकाशित लेखातील कोणत्याही विधानाची/माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही. लेखातील गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.